अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत;
ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत.
तू जी याहवेहचा धावा करते,
स्वतःला विसावा देऊ नको,
आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत
व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत,
परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.