याहवेह हे असे म्हणतात—
जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत:
“मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे,
जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो,
जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.
केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते,
तर शांती एखाद्या नदीप्रमाणे,
तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते