मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही.
तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही,
तरी मी तुला सामर्थ्य देईन.
मग सूर्योदयापासून
ते सूर्यास्तापर्यंत
सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच.
मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही