1
यशायाह 11:2-3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा— आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशायाह 11:2-3
2
यशायाह 11:1
इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल; त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल.
एक्सप्लोर करा यशायाह 11:1
3
यशायाह 11:4
परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.
एक्सप्लोर करा यशायाह 11:4
4
यशायाह 11:5
धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.
एक्सप्लोर करा यशायाह 11:5
5
यशायाह 11:9
माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत, कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.
एक्सप्लोर करा यशायाह 11:9
6
यशायाह 11:6
लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.
एक्सप्लोर करा यशायाह 11:6
7
यशायाह 11:10
त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.
एक्सप्लोर करा यशायाह 11:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ