परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले,
त्याचे बाहू मजबूत राहिले,
याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर,
ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.
कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत,
कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात,
वरून स्वर्गातील आशीर्वाद,
खोलातील डोहातून निघणार्या झर्यातील आशीर्वाद,
स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.