1
उत्पत्ती 35:11-12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील. अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.”
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:11-12
2
उत्पत्ती 35:3
चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:3
3
उत्पत्ती 35:10
परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:10
4
उत्पत्ती 35:2
म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:2
5
उत्पत्ती 35:1
मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:1
6
उत्पत्ती 35:18
तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन ठेवले.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 35:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ