1
यहेज्केल 4:4-5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील. त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यहेज्केल 4:4-5
2
यहेज्केल 4:6
“हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत.
एक्सप्लोर करा यहेज्केल 4:6
3
यहेज्केल 4:9
“तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे.
एक्सप्लोर करा यहेज्केल 4:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ