“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील. जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.