1
कलस्सैकरांस 3:13
मराठी समकालीन आवृत्ती
एकमेकांचे प्रीतिने सहन करावे व जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभुने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:13
2
कलस्सैकरांस 3:2
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, जगीक गोष्टींकडे लावू नका.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:2
3
कलस्सैकरांस 3:23
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभुसाठी म्हणून करा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:23
4
कलस्सैकरांस 3:12
यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, ममता, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:12
5
कलस्सैकरांस 3:16-17
स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:16-17
6
कलस्सैकरांस 3:14
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:14
7
कलस्सैकरांस 3:1
यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जेथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:1
8
कलस्सैकरांस 3:15
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हालाही या शांतिसाठी बोलावलेले आहात आणि तुम्ही कृतज्ञ राहा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:15
9
कलस्सैकरांस 3:5
म्हणून आपल्यातील जगीक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:5
10
कलस्सैकरांस 3:3
कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:3
11
कलस्सैकरांस 3:8
परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे ही सर्व आपल्यापासून दूर करा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:8
12
कलस्सैकरांस 3:9-10
एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसहीत तुम्ही काढून टाकला आहे. तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:9-10
13
कलस्सैकरांस 3:19
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:19
14
कलस्सैकरांस 3:20
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभुला संतोष होतो.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:20
15
कलस्सैकरांस 3:18
पत्नींनो, तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा, कारण प्रभुमध्ये हे उचित आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 3:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ