1
2 राजे 2:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 राजे 2:9
2
2 राजे 2:11
ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:11
3
2 राजे 2:10
एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”
एक्सप्लोर करा 2 राजे 2:10
4
2 राजे 2:14
त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:14
5
2 राजे 2:12
अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्यांना पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:12
6
2 राजे 2:8
तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:8
7
2 राजे 2:1
जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ