रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले:
“ते चांगले आहेत;
त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.”
तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले, आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते.