हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली. म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.