1
1 शमुवेल 17:45
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:45
2
1 शमुवेल 17:47
येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:47
3
1 शमुवेल 17:37
ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:37
4
1 शमुवेल 17:46
आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:46
5
1 शमुवेल 17:40
नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:40
6
1 शमुवेल 17:32
दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 17:32
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ