1
मार्क 9:23
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 9:23
2
मार्क 9:24
लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले, “माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर करण्याकरता मला साहाय्य करा.”
एक्सप्लोर करा मार्क 9:24
3
मार्क 9:28-29
येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.”
एक्सप्लोर करा मार्क 9:28-29
4
मार्क 9:50
मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाने आणता येईल? तुमच्यात मीठ असू द्या व तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
एक्सप्लोर करा मार्क 9:50
5
मार्क 9:37
“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो व जो कोणी माझा स्वीकार करतो तो केवळ माझा नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याचादेखील स्वीकार करतो.
एक्सप्लोर करा मार्क 9:37
6
मार्क 9:41
तुम्ही माझे आहात म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो त्याच्या पारितोषिकाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला ठामपणे सांगतो.”
एक्सप्लोर करा मार्क 9:41
7
मार्क 9:42
विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हे त्याच्या हिताचे आहे.
एक्सप्लोर करा मार्क 9:42
8
मार्क 9:47-48
तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.
एक्सप्लोर करा मार्क 9:47-48
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ