1
मार्क 5:34
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 5:34
2
मार्क 5:25-26
बारा वर्षे रक्तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता.
एक्सप्लोर करा मार्क 5:25-26
3
मार्क 5:29
तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली.
एक्सप्लोर करा मार्क 5:29
4
मार्क 5:41
मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम”, ह्याचा अर्थ “लहान मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”
एक्सप्लोर करा मार्क 5:41
5
मार्क 5:35-36
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?” परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
एक्सप्लोर करा मार्क 5:35-36
6
मार्क 5:8-9
तो असे म्हणाला कारण येशू म्हणत होता, “अरे भुता, ह्या माणसातून नीघ.” येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.
एक्सप्लोर करा मार्क 5:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ