1
मार्क 13:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील, त्याचा उद्धार होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 13:13
2
मार्क 13:33
सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही.
एक्सप्लोर करा मार्क 13:33
3
मार्क 13:11
ते तुम्हांला धरून न्यायालयात नेतील, तेव्हा आपण काय बोलावे, ह्याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर बोलणारा पवित्र आत्मा आहे.
एक्सप्लोर करा मार्क 13:11
4
मार्क 13:31
आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
एक्सप्लोर करा मार्क 13:31
5
मार्क 13:32
त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ पित्याला माहीत आहे.
एक्सप्लोर करा मार्क 13:32
6
मार्क 13:7
आणखी, तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही.
एक्सप्लोर करा मार्क 13:7
7
मार्क 13:35-37
म्हणून जागृत राहा. घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे किंवा सकाळी, हे तुम्हांला माहीत नाही. नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो, तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
एक्सप्लोर करा मार्क 13:35-37
8
मार्क 13:8
राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ आहे.
एक्सप्लोर करा मार्क 13:8
9
मार्क 13:10
परंतु प्रथम सर्व राष्ट्रांत शुभवर्तमानाची घोषणा होणे आवश्यक आहे.
एक्सप्लोर करा मार्क 13:10
10
मार्क 13:6
पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील.
एक्सप्लोर करा मार्क 13:6
11
मार्क 13:9
तुम्ही स्वतःला सांभाळा. ते तुम्हांला न्यायसभांच्याा स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हांला मारहाण केली जाईल. माझ्याकरता तुम्ही साक्ष द्यावी म्हणून राज्यपाल व राजांसमोर तुम्हांला उभे राहावे लागेल.
एक्सप्लोर करा मार्क 13:9
12
मार्क 13:22
कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील.
एक्सप्लोर करा मार्क 13:22
13
मार्क 13:24-25
ही अरिष्टे येऊन गेल्यावर त्या दिवसांत सूर्य अंधकारमय होईल; चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील.
एक्सप्लोर करा मार्क 13:24-25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ