त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वसती करावी. ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे, ज्यावरून त्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती; हे तुम्ही सर्व पवित्र लोकांसह समजून घ्यावे व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावी, म्हणजेच तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.