1
रोम. 14:17-18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोम. 14:17-18
2
रोम. 14:8
कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.
एक्सप्लोर करा रोम. 14:8
3
रोम. 14:19
तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
एक्सप्लोर करा रोम. 14:19
4
रोम. 14:13
तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
एक्सप्लोर करा रोम. 14:13
5
रोम. 14:11-12
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
एक्सप्लोर करा रोम. 14:11-12
6
रोम. 14:1
जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
एक्सप्लोर करा रोम. 14:1
7
रोम. 14:4
दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
एक्सप्लोर करा रोम. 14:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ