1
रोम. 12:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोम. 12:2
2
रोम. 12:1
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
एक्सप्लोर करा रोम. 12:1
3
रोम. 12:12
आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे
एक्सप्लोर करा रोम. 12:12
4
रोम. 12:21
वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
एक्सप्लोर करा रोम. 12:21
5
रोम. 12:10
बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे
एक्सप्लोर करा रोम. 12:10
6
रोम. 12:9
प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा.
एक्सप्लोर करा रोम. 12:9
7
रोम. 12:18
शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
एक्सप्लोर करा रोम. 12:18
8
रोम. 12:19
प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
एक्सप्लोर करा रोम. 12:19
9
रोम. 12:11
कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा.
एक्सप्लोर करा रोम. 12:11
10
रोम. 12:3
कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
एक्सप्लोर करा रोम. 12:3
11
रोम. 12:17
वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.
एक्सप्लोर करा रोम. 12:17
12
रोम. 12:16
एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
एक्सप्लोर करा रोम. 12:16
13
रोम. 12:20
पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
एक्सप्लोर करा रोम. 12:20
14
रोम. 12:14-15
जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा.
एक्सप्लोर करा रोम. 12:14-15
15
रोम. 12:13
पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
एक्सप्लोर करा रोम. 12:13
16
रोम. 12:4-5
कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
एक्सप्लोर करा रोम. 12:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ