आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो, जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.