1
यश. 45:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा यश. 45:3
2
यश. 45:2
मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन
एक्सप्लोर करा यश. 45:2
3
यश. 45:5-6
मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.
एक्सप्लोर करा यश. 45:5-6
4
यश. 45:7
मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
एक्सप्लोर करा यश. 45:7
5
यश. 45:22
अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.
एक्सप्लोर करा यश. 45:22
6
यश. 45:1
परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.
एक्सप्लोर करा यश. 45:1
7
यश. 45:23
मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
एक्सप्लोर करा यश. 45:23
8
यश. 45:4
कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले.
एक्सप्लोर करा यश. 45:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ