1
निर्ग. 23:25-26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 23:25-26
2
निर्ग. 23:20
पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
एक्सप्लोर करा निर्ग. 23:20
3
निर्ग. 23:22
जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
एक्सप्लोर करा निर्ग. 23:22
4
निर्ग. 23:2-3
दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस. एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 23:2-3
5
निर्ग. 23:1
खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 23:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ