1
कल. 2:6-7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यामध्ये वाढत जा.
तुलना करा
एक्सप्लोर करा कल. 2:6-7
2
कल. 2:8
तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
एक्सप्लोर करा कल. 2:8
3
कल. 2:13-14
आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे; आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले.
एक्सप्लोर करा कल. 2:13-14
4
कल. 2:9-10
कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा
एक्सप्लोर करा कल. 2:9-10
5
कल. 2:16-17
म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. या गोष्टी तर येणार्या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे.
एक्सप्लोर करा कल. 2:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ