1
2 राजे 2:9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 राजे 2:9
2
2 राजे 2:11
एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:11
3
2 राजे 2:10
एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
एक्सप्लोर करा 2 राजे 2:10
4
2 राजे 2:14
त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:14
5
2 राजे 2:12
अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:12
6
2 राजे 2:8
तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:8
7
2 राजे 2:1
आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
एक्सप्लोर करा 2 राजे 2:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ