गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीती सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले. त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.