1
मत्तय 27:46
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 27:46
2
मत्तय 27:51-52
तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले; थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली
एक्सप्लोर करा मत्तय 27:51-52
3
मत्तय 27:50
मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.
एक्सप्लोर करा मत्तय 27:50
4
मत्तय 27:54
शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.
एक्सप्लोर करा मत्तय 27:54
5
मत्तय 27:45
मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
एक्सप्लोर करा मत्तय 27:45
6
मत्तय 27:22-23
पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
एक्सप्लोर करा मत्तय 27:22-23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ