स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता,
देव त्याचे कान उघडतो; त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो.
तेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो;
तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्या नाशापासून त्याचा जीव वाचवतो.