तरी बलिष्ठांनाही देव आपल्या सामर्थ्याने राखतो; त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात.
तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.
ते उन्नती पावतात; तरी अल्पकाळातच ते नाहीतसे होतात; ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते, कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात.