परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.
आता पाहा, आज तुझ्या हातांत असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला माझ्याबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन; पण माझ्याबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस; पाहा, सगळा देश तुझ्यापुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा.”