1
याकोब 1:2-3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो
तुलना करा
एक्सप्लोर करा याकोब 1:2-3
2
याकोब 1:5
जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो
एक्सप्लोर करा याकोब 1:5
3
याकोब 1:19
माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा
एक्सप्लोर करा याकोब 1:19
4
याकोब 1:4
आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.
एक्सप्लोर करा याकोब 1:4
5
याकोब 1:22
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
एक्सप्लोर करा याकोब 1:22
6
याकोब 1:12
जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.
एक्सप्लोर करा याकोब 1:12
7
याकोब 1:17
प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.
एक्सप्लोर करा याकोब 1:17
8
याकोब 1:23-24
कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणार्या माणसासारखा आहे; तो स्वत:ला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो.
एक्सप्लोर करा याकोब 1:23-24
9
याकोब 1:27
देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.
एक्सप्लोर करा याकोब 1:27
10
याकोब 1:13-14
कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो.
एक्सप्लोर करा याकोब 1:13-14
11
याकोब 1:9
दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा
एक्सप्लोर करा याकोब 1:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ