1
यशया 9:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 9:6
2
यशया 9:2
अंधकारात चालणार्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यांवर प्रकाश पडला आहे.
एक्सप्लोर करा यशया 9:2
3
यशया 9:7
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
एक्सप्लोर करा यशया 9:7
4
यशया 9:5
युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.
एक्सप्लोर करा यशया 9:5
5
यशया 9:1
तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील.
एक्सप्लोर करा यशया 9:1
6
यशया 9:3
तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.
एक्सप्लोर करा यशया 9:3
7
यशया 9:4
कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्याचा सोटा मोडला आहेस.
एक्सप्लोर करा यशया 9:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ