1
यशया 54:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 54:17
2
यशया 54:10
कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.
एक्सप्लोर करा यशया 54:10
3
यशया 54:4
भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.
एक्सप्लोर करा यशया 54:4
4
यशया 54:5
कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.
एक्सप्लोर करा यशया 54:5
5
यशया 54:2
आपल्या डेर्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नकोस; आपल्या दोर्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक.
एक्सप्लोर करा यशया 54:2
6
यशया 54:13
तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.
एक्सप्लोर करा यशया 54:13
7
यशया 54:8
रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.
एक्सप्लोर करा यशया 54:8
8
यशया 54:7
केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन.
एक्सप्लोर करा यशया 54:7
9
यशया 54:9
नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो; नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटावणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे.
एक्सप्लोर करा यशया 54:9
10
यशया 54:12
तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन.
एक्सप्लोर करा यशया 54:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ