1
यशया 42:6-7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन; आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 42:6-7
2
यशया 42:8
मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.
एक्सप्लोर करा यशया 42:8
3
यशया 42:1
पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.
एक्सप्लोर करा यशया 42:1
4
यशया 42:3-4
चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.
एक्सप्लोर करा यशया 42:3-4
5
यशया 42:16
माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.
एक्सप्लोर करा यशया 42:16
6
यशया 42:9
पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”
एक्सप्लोर करा यशया 42:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ