1
यशया 1:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 1:18
2
यशया 1:19
तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल
एक्सप्लोर करा यशया 1:19
3
यशया 1:17
चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.
एक्सप्लोर करा यशया 1:17
4
यशया 1:20
तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”
एक्सप्लोर करा यशया 1:20
5
यशया 1:16
आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या
एक्सप्लोर करा यशया 1:16
6
यशया 1:15
तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.
एक्सप्लोर करा यशया 1:15
7
यशया 1:13
निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.
एक्सप्लोर करा यशया 1:13
8
यशया 1:3
बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.”
एक्सप्लोर करा यशया 1:3
9
यशया 1:14
माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.
एक्सप्लोर करा यशया 1:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ