1
यहेज्केल 3:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा यहेज्केल 3:18
2
यहेज्केल 3:19
तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.
एक्सप्लोर करा यहेज्केल 3:19
3
यहेज्केल 3:17
“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.
एक्सप्लोर करा यहेज्केल 3:17
4
यहेज्केल 3:20
तसेच नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल; तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
एक्सप्लोर करा यहेज्केल 3:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ