एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला.