हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.
हे प्रभू, ऐक; हे प्रभू, क्षमा कर; हे प्रभू, ऐक, कार्य कर; विलंब लावू नकोस; हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक ह्यांना तुझे नाम दिले आहे; म्हणून तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.”