शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही.
ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.
ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.”