पाहा, परमेश्वर म्हणतो “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणार्याला गाठील व द्राक्षे तुडवणारा बी पेरणार्याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील.
मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.