‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल
तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही;
व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही;
कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे;
ते कानांनी मंद ऐकतात;
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत;
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये,
त्यांनी वळू नये,
आणि मी त्यांना बरे करू नये.’