कारण नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते.
‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली ‘डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.