अश्दोदकर दुसर्या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले.
दुसर्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.