1
१ राजे 18:37
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा १ राजे 18:37
2
१ राजे 18:36
संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे.
एक्सप्लोर करा १ राजे 18:36
3
१ राजे 18:21
एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
एक्सप्लोर करा १ राजे 18:21
4
१ राजे 18:38
तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.
एक्सप्लोर करा १ राजे 18:38
5
१ राजे 18:39
हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”
एक्सप्लोर करा १ राजे 18:39
6
१ राजे 18:44
सातव्या खेपेस तो म्हणाला, “पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे.” एलीया म्हणाला, “अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.”
एक्सप्लोर करा १ राजे 18:44
7
१ राजे 18:46
परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.
एक्सप्लोर करा १ राजे 18:46
8
१ राजे 18:41
एलीया अहाबाला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.”
एक्सप्लोर करा १ राजे 18:41
9
१ राजे 18:43
त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले, “काही दिसत नाही.” एलिया म्हणाला, “आणखी सात वेळा जा.”
एक्सप्लोर करा १ राजे 18:43
10
१ राजे 18:30
मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली.
एक्सप्लोर करा १ राजे 18:30
11
१ राजे 18:24
तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.”
एक्सप्लोर करा १ राजे 18:24
12
१ राजे 18:31
‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले
एक्सप्लोर करा १ राजे 18:31
13
१ राजे 18:27
दोन प्रहरी एलीयाने त्यांची थट्टा करून म्हटले, “मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकान्तात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे.”
एक्सप्लोर करा १ राजे 18:27
14
१ राजे 18:32
त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली.
एक्सप्लोर करा १ राजे 18:32
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ