मत्तय 8

8
येशु कुष्टरोगीले बरं करस
(मार्क १:४०-४५; लूक ५:१२-१६)
1मंग येशु डोंगरवरतीन उतरना तवय लोकसनी गर्दी त्यानामांगे चाली राहींती. 2तवय दखा, एक कुष्टरोगी येशुकडे ईसन त्याना पाया पडीन त्याले बोलना, प्रभुजी, तुमनी ईच्छा व्हई तर माले शुध्द करासाठे तुम्हीन समर्थ शेतस. 3तवय येशुनी हात पुढे करीसन त्याले स्पर्श करा अनं बोलना, मनी ईच्छा शे, तु शुध्द व्हय; अनं लगेच त्याना कुष्टरोग जाईसन तो बरा व्हयना. 4मंग येशुनी त्याले सांगं, संभाळ, हाई कोणलेच काही सांगु नको; तर तु जाईसन “याजकले दखाड अनी त्यासले खरं वाटाले पाहिजे म्हणीसन तुना शुध्दीकरण व्हवाकरता, जे अर्पण मोशेनी कराले लाई देयल शे ते कर.”
येशु सुबेदारना सेवकले बरं करस
(लूक ७:१-१०)
5मंग येशु कफर्णहुम गावले वना, तवय एक रोमी अधिकारी त्यानाकडे ईसन त्याले ईनंती करीसन बोलना, 6प्रभुजी, मना सेवक लखवामा भलताच पिडीसन घरमा पडेल शे. 7येशु त्याले बोलना, “मी ईसन त्याले बरं करसु.” 8तवय अधिकारीनी उत्तर दिधं, प्रभुजी तुम्हीन मना घर यावं, ईतली मनी लायकी नही; पण एक शब्द बोला म्हणजे मना सेवक बरा व्हई जाई. 9मी एक जबाबदार अधिकारी शे, अनी मना हातखाल शिपाई शेतस; मी एकले सांगस, जा! तर तो जास, एकले सांगं ये! तर तो येस, अनी सेवकले सांगं, हाई कर तर तो ते करस. 10हाई ऐकीसन येशुले आश्चर्य वाटनं, अनं आपलामांगे येणारा लोकसले तो बोलना, मी तुमले सत्य सांगस, एवढा ईश्वास माले इस्त्राएलमा बी दिसना नही. 11#लूक १३:२९मी तुमले सांगस की, “पुर्व अनं पश्चिमकडतीन” बराच लोके येतीन अनं स्वर्गना राज्यमा अब्राहाम, इसहाक, अनं याकोब, यासना पंगतमा बसतीन; 12#मत्तय २२:१३; २५:३०; लूक १३:२८पण राज्यना पोऱ्या बाहेरना अंधारमा टाकाई जातीन, अनं तठे रडनं अनं दात खानं राही. 13मंग येशु रोमी अधिकारीले बोलना, जाय तु ईश्वास ठेयेल प्रमाणे तुले भेटी अनी त्याच येळले तो सेवक बरा व्हयना.
येशु बराच रोगीसले बरं करस
(मार्क १:२९-३४; लूक ४:३८-४१)
14जवय येशु पेत्रना घरमा गया, तवय शिमोननी सासु तापमा पडेल शे, अस त्यानी दखं. 15मंग येशुनी तिना हातले स्पर्श करा; अनं तिना ताप निंघी गया; अनी ती ऊठीसन त्यानी सेवा कराले लागनी. 16मंग संध्याकाय व्हयनी तवय लोकसनी बराच भूतं लागेलसले येशुकडे आणं; तवय त्यानी बोलीसन भूतं काढात अनं सर्वा रोगीसले बरं करं. 17“त्यानी आमना आजार स्वतःवर लिधात अनी आमना रोग सहन करात,” हाई जे यशया संदेष्टासनी सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं.
येशुना होणारा शिष्य
(लूक ९:५७-६२)
18मंग येशुनी आपला आजुबाजूले लोकसनी गर्दी शे, अस दखीसन शिष्यसले तलावना पलीकडे जावानी आज्ञा करी. 19तवय शास्त्री ईसन त्याले बोलना, “गुरजी, आपण जठे, कोठे जाशात तठे मी तुमना मांगे ईसु.” 20येशु त्याले बोलना, कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही शे. 21तवय शिष्यसपैकी एकजण त्याले बोलना, प्रभुजी माले पहीले मना बापले पुराले जावु द्या. 22येशुनी उत्तर दिधं, तु मनामांगे ये ज्या मरेल शेतस त्यासले त्या मरेलसले पुरू दे.
येशु वादयले शांत करस
(मार्क ४:३५-४१; लूक ८:२२-२५)
23मंग येशु नावमा चढना तवय त्याना शिष्य त्यानासंगे गयात. 24तवय दखा, समुद्रमा मोठं वादय ऊठणं, ते इतलं मोठं व्हतं की, लाटासनी नावले झाकी टाकं, तवय येशु झोपेल व्हता. 25तवय त्या त्यानाजोडे ईसन त्याले ऊठाडीसन बोलु लागनात. “प्रभुजी, वाचाडा आम्ही बुडी ऱ्हायनुत.” 26अनं तो त्यासले बोलना, “अरे अईश्वासी, तुम्हीन इतला का बरं घाबरणात?” मंग त्यानी ऊठीसन समुद्र अनं वारा यासले धमकाडं अनी त्या लगेच शांत व्हयनात. 27त्या नावमधला माणसंसले आश्चर्य वाटनं अनं त्या बोलु लागनात, “हावु कोणता प्रकारना माणुस शे की, वारा, अनं समुद्र बी यानं ऐकतस.”
येशु दोन भूत लागेल माणुससले बरं करस
(मार्क ५:१-२०; लूक ८:२६-३९)
28मंग येशु पलीकडला गरसेकरसना प्रदेशमा गया, तवय दोन भूत लागेल माणसं कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटनात; त्या ईतला भयानक अनं भितीदायक व्हतात की, त्या वाटवर कोणलेच जाणं शक्य नव्हतं. 29तवय दखा, त्या वरडीन बोलनात, “हे देवना पोऱ्या; तु आमनामा का बरं पडस? ठरायेल येळना अगोदर तु आमले आठे छळाले येल शे का?” 30तठेच त्यासनापाईन थोडा अंतरवर डुकरंसना मोठा कळप चरी राहींता. 31मंग त्या भूते त्याले ईनंती कराले लागनात की, जर तु आमले काढी ऱ्हायना तर आमले त्या डुकरंसना कळपमा धाड.
32मंग येशुनी त्यासले सांगं, “जा,” अनी त्या जाईसन त्या डुकरंसमा घुसनात; अनं दखा, तो डुकरंसना कळप कडावरतीन पळत जाईसन समुद्रमा पडना अनी तठेच त्या बुडिसन मरनात. 33मंग डुकरं चारनारा पळनात अनं नगरमा जाईसन भूत लागेल माणुसबद्दल अनी तठे घडेल सर्व घटनाबद्दल त्यासनी लोकसले सांगं. 34तवय दखा, सर्व नगरना लोके येशुले भेटाले निंघनात अनी त्याले दखीसन, त्यासनी त्याले आमना गावमाईन निंघी जा अशी ईनंती करी.

Tällä hetkellä valittuna:

मत्तय 8: NTAii20

Korostus

Jaa

Kopioi

None

Haluatko, että korostuksesi tallennetaan kaikille laitteillesi? Rekisteröidy tai kirjaudu sisään