उत्प. 10

10
नोहाच्या मुलांचे वंशज
1 इति. 1:5-27
1नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली. 2याफेथाचे पुत्र#वंशावळी गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. 3गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते. 4यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते. 5यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले. 6हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते. 7कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते. 8कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला. 9तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे. 10त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल#बाबेलोन, एरक, अक्काद व कालने ही होती. 11त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली 12आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. 13मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, 14पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला. 15कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा, 16तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17हिव्वी, आर्की व शीनी 18अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली. 19कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती. 20कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते. 21शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. 22शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते. 23अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते. 24अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला. 25एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. 26यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह 27हदोराम, ऊजाल, दिक्ला 28ओबाल, अबीमाएल, शबा, 29ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते. 30त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता. 31आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र. 32पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.

Tällä hetkellä valittuna:

उत्प. 10: IRVMar

Korostus

Jaa

Kopioi

None

Haluatko, että korostuksesi tallennetaan kaikille laitteillesi? Rekisteröidy tai kirjaudu sisään