मत्तय 1:18-19
मत्तय 1:18-19 MRCV
येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा िववाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.