1
लूक 17:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
Compare
Explore लूक 17:19
2
लूक 17:4
त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.”
Explore लूक 17:4
3
लूक 17:15-16
त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.
Explore लूक 17:15-16
4
लूक 17:3
तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.
Explore लूक 17:3
5
लूक 17:17
तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?
Explore लूक 17:17
6
लूक 17:6
प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.
Explore लूक 17:6
7
लूक 17:33
जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
Explore लूक 17:33
8
लूक 17:1-2
मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे.
Explore लूक 17:1-2
9
लूक 17:26-27
नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. ‘नोहा तारवात गेला’ आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते.
Explore लूक 17:26-27
Home
Bible
Plans
Videos