1
मत्तय 4:4
वऱ्हाडी नवा करार
तवा येशूनं उत्तर देलं, “पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि माणूस फक्त भाकरीनच नाई, तर देवाच्या हरेक वचनाले मानून जिवंत राईन.”
Σύγκριση
Διαβάστε मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
तवा येशूनं त्याले म्हतलं, “हे सैताना तू माह्यापासून दूर हून जा, कावून कि पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि तू आपल्या प्रभू देवालेच नमन कर, अन् फक्त त्याचीच आराधना कर.”
Διαβάστε मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
तवा येशूने सैतानाले म्हतलं, “पवित्रशास्त्रात हे पण लिवलेल हाय, कि तू आपल्या प्रभू आपल्या देवाची परीक्षा करू नको.”
Διαβάστε मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
तवा पवित्र आत्मा येशूले सुनसान जागी घेऊन गेला, ह्या साठी कि सैतानाने त्याची परीक्षा घेतली पायजे. अन् तो चाळीस दिवस अन् चाळीस रात्र उपासी रायला, तवा त्याले भूक लागली.
Διαβάστε मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
मंग येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य अनुकरण करा, व माह्याले शिष्य बना, आतापरेंत तुमी मासोया पकडणारे होते, पण आज पासून मी तुमाले हे शिकवतो की लोकायले माह्या जवळ विश्वासात कसं आणावं.” मंग त्यायन लवकरच मासोया पकडनं थांबवलं, अन् ते त्याच्या मांग गेले.
Διαβάστε मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
तवा पासून येशू उपदेश करू लागला, अन् म्हणू लागला, “आपआपल्या पापांपासून मन फिरून पश्चाताप करा, कावून कि देवाचं राज्य जवळ आलं हाय.”
Διαβάστε मत्तय 4:17
Αρχική
Αγία Γραφή
Σχέδια
Βίντεο