1
लूक 6:38
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
द्या आणि तुम्हाला दिले जाईल. मोठ्या प्रमाणात दाबून, हालवून, ओसांडून वाहू लागेल अशा मापाने परत मिळेल. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”
Σύγκριση
Διαβάστε लूक 6:38
2
लूक 6:45
कारण अंतःकरणात जे भरलेले असते तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य वाईट गोष्टी बाहेर काढतो.
Διαβάστε लूक 6:45
3
लूक 6:35
तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.
Διαβάστε लूक 6:35
4
लूक 6:36
जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा.
Διαβάστε लूक 6:36
5
लूक 6:37
“न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविण्यात येणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल.
Διαβάστε लूक 6:37
6
लूक 6:27-28
“पण तुम्ही जे माझे ऐकत आहात, त्यांना मी सांगतोः तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे भले करा. जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
Διαβάστε लूक 6:27-28
7
लूक 6:31
जो व्यवहार इतरांनी तुमच्यासाठी करावा अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्यासाठी करा.
Διαβάστε लूक 6:31
8
लूक 6:29-30
जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर त्यांच्यापुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा काढून घेतला, तर त्यांना तुमची बंडीही घेण्यास मनाई करू नका. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि जो तुमचे घेतो, त्याची परत मागणी करू नका.
Διαβάστε लूक 6:29-30
9
लूक 6:43
“चांगल्या जातीचे झाड वाईट फळ देत नाही किंवा वाईट जातीचे झाड चांगले फळ देत नाही.
Διαβάστε लूक 6:43
10
लूक 6:44
प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. लोक काटेरी झुडूपावरून अंजीर काढीत नाहीत किंवा काटेरी झुडूपावरून द्राक्षे काढीत नाहीत.
Διαβάστε लूक 6:44
Αρχική
Αγία Γραφή
Σχέδια
Βίντεο