मत्तय 19:20-22
मत्तय 19:20-22 VAHNT
त्या नवजवानान येशूले म्हतलं, ह्या सगळ्या आज्ञा मी लहान पणापासून मानत आलो हाय, आता माह्यात कोणत्या गोष्टीची कमी हाय? येशूनं त्याले म्हतलं, जर तुले सिद्ध बन्याचं अशीन, “तुह्यात एका गोष्टीची कमी हाय, जाय जे काई संपत्ती तुह्या जवळ हाय ते इकून टाक, अन् गरीबायले दान कर, म्हणजे तुले स्वर्गात धन भेटीन, अन् माह्य अनुकरण करून माह्यवाला शिष्य बन.” पण तो जवान हे गोष्ट आयकून दुखी होऊन चालला गेला, कावून कि तो लय श्रीमंत होता.